अन्य २२ कलमांचाही समावेश

अकोला – येथील शहर पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकार्यांविरुद्ध ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यासह विविध २२ कलमांन्वये सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. येथील पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बी.आर्. घाडगे यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंद केले आहेत. गुन्हे नोंद करून हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. ‘परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घेत होते. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी बी.आर्. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना २६ एप्रिल या दिवशी पाठवलेल्या पत्रांत केली होती.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !