कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात दीड कोटी रुपयांची अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे. ज्या परिसरासाठी सूचना द्यायची आहे, त्या ठिकाणीच आवाज ऐकू येणार असल्याने मंदिराचे मांगल्य-पावित्र्य, शांतता जपली जाणार आहे.
मंदिरातील गरुड मंडपात झालेल्या सोहळ्यात या यंत्रणेचे लोकार्पण, तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव, सौ. कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव श्री. विजय पोवार, सदस्य सर्वश्री शिवाजीराव जाधव, राजू जाधव, राजाराम गरूड, मंदिराचे व्यवस्थापक श्री. धनाजी जाधव उपस्थित होते.