पुरातत्व विभागाचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र
कोल्हापूर – गेल्या ९ मासांपासून श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात मनकर्णिका कुंडाचे खोदकाम चालू आहे. या खोदकामाच्या कालावधीत कोणत्या वस्तू मिळाल्या, याची माहिती नुकतीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पत्रकार परिषद घेऊन दिली. त्या आधारेच पुरातत्व खात्याने देवस्थान समितीला ‘खोदकामाच्या कालावधीत सापडलेल्या पुरातन वस्तू पुरातत्व विभागाकडे जमा कराव्यात’, असे पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, हे पुरातन अवशेष ‘टाऊन हॉल म्युझियम, कोल्हापूर’, या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात येतील.