कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – प्रत्येक वर्षी जानेवारी-फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मासात सूर्यास्ताच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीच्या संदर्भात एक विलक्षण घटना अनुभवण्यास येते, ती म्हणजे किरणोत्सवाची !
यंदाच्या वर्षी ९ ते ११ नोव्हेंबर २०२० या ३ दिवसांत हा किरणोत्सव झाल्यानंतर आता ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२१ या दिवशी हा किरणोत्सव होत आहे. यात पहिल्या दिवशी सूर्याची किरणे थेट श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांवर पडतात, दुसर्या दिवशी सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात, तर तिसर्या दिवशी सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.