शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !

इस्लामी देशांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा नाहीच !

पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

भाग्यनगरचे रणांगण !

काँग्रेसने ७० वर्षे मुसलमानांना वापरले आणि आता ‘एम्.आय.एम्., तेलंगाणा राष्ट्र समिती आदी पक्षही केवळ स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरून घेत आहोत’, हे त्यांना कळेपर्यंत कदाचित् त्यांचे अधिक पतन झालेले असेल. कसेही असले, तरी यंदाची निवडणूक एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांना कठीण जाणार आहे, हे निश्‍चित !

मुंबईमध्ये पांडुरंग सकपाळ यांच्याकडून ‘ऑनलाईन’ अजान स्पर्धेचे आयोजन

अजानची स्पर्धा काफिरांनी आयोजित करणे इस्लामला मान्य आहे का ? अशी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी ‘इस्लामी धर्मगुरूंचे मत काय आहे ?’, हे जाणून घेतले असते, तरी ही स्पर्धा आयोजित करण्याचा खटाटोप केला नसता !

होमिओपॅथी महिला डॉक्टरला पतीकडून इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी

केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !

रशियामध्ये मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर तरुणींशी विवाह करण्यावर बंदी

मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय : लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्‍या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?

माकपकडून जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप करत दलित महिला इस्लाम स्वीकारण्याच्या सिद्धतेत !

माकप एक ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष ! एरव्ही दलितांच्या नावाने राजकारण करणारे बहुतेक राजकीय पक्ष आता तोंड का उघडत नाहीत ? या महिलेने इस्लाम स्वीकारू नये, यासाठी हिंदु संघटनांनीही प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

अझरबैजानच्या सैनिकांकडून चर्चवर चढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !

हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दर्शवणार्‍या कृती

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्‍या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत.

स्वधर्माचरणापासून दूर नेणारे आणि अन्य पंथियांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर !

मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहेत, तर ख्रिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहेत आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य झालेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येेने बळी पडत आहे.