प्रसिद्धी मिळूनही ती मृत्यूनंतरच्या जीवनासाठी उपयोगी नसल्याचे उमगले
इस्लाम धर्म, अल्लाह आणि कुराण यांच्यासाठी मनोरंजन विश्वातून बाहेर पडणार्या अभिनेत्याकडून हिंदु धर्मीय बोध घेतील का ?
मुंबई – अभिनेत्री झायरा वसिम आणि सना खान यांच्यानंतर एम्टीव्ही ‘रोडिज रेव्होल्युशन’मधून प्रसिद्धी मिळवलेला रोडिज स्पर्धक आणि मॉडेल साकिब खान यानेे इस्लाम धर्मासाठी मनोरंजनसृष्टी आणि वलयांकित जगाला सोडले आहे. धर्म आणि इस्लाम यांच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. साकीबने सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
त्याने म्हटले आहे, ‘‘भविष्यात मी मॉडेलिंग आणि अभिनय करणार नाही. माझ्याकडे काम नाही किंवा मी हार मानली, असे नाही. माझ्याकडे पुष्कळ चांगली कामे आहेत; पण अल्लाहची इच्छा नव्हती. फक्त काहीतरी चांगले माझ्या नशिबात अल्लाहने लिहिले असेल. इंशा अल्लाह !’’
त्याने पुढे लिहिले आहे, ‘‘मी मुंबईत संघर्ष पाहिला आहे. इथे जगणे कठीण आहे. एका वर्षापेक्षा अल्प कालावधीतही मी चांगली प्रसिद्धी आणि चाहते मिळवले; पण ते जगासाठी आणि मृत्यूनंतरच्या जीवनासाठी काहीच नाही. मला काही कळत नव्हते आणि मी इस्लामच्या विरोधात जात होतो. मी नमाजपठण करायचो, तरी सुद्धा काहीतरी कमी जाणवत होती. ती शांतता आणि अल्लाह यांच्याविषयीचे माझे दायित्व होते. आता मी पूर्णपणे अल्लाहला शरण जात आहे. जी शांतता होती, ती आता माझ्या समोर आहे, ते म्हणजे माझं कुराण !’’