जर्मनीमध्ये इस्लामिक स्टेटच्या माजी इमामाला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या एका न्यायालयाने एका मशिदीच्या अहमद अब्दुल अजीज अब्दुल्ला उपाख्य अबूवाला या ३७ वर्षीय माजी इमामाला इस्लामिक स्टेटचा आतंकवादी असल्याच्या आरोपामध्ये दोषी ठरवून त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ? – संपादक)

अबूवाला आणि त्याची टोळी ही मुसलमान युवकांना कट्टरतावादी बनवत होती आणि इस्लामिक स्टेटच्या नियंत्रण असणार्‍या देशांतील भागांत पाठवत होती.