सिंहली धाडस हवे !

भारताला ‘वाघांचा देश’ म्हणून ओळखले जाते; मात्र सध्या भारतातील वाघांची संख्या अल्प होत चालली आहे. अनेक वर्षांपासून ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील पूर्वीचे शासनकर्ते हे वाघासारखे शूर आणि कर्तबगार होते. त्यामुळे भारतावर असंख्य आक्रमणे होऊनही ती परतवून लावण्यात आली. आक्रमणकर्त्यांचा पराभव करण्यात आला. तरीही शेवटी मोगल आणि ब्रिटीश यांनी काही शतके भारतावर राज्य केले. भारत स्वतंत्र झाला, तरी त्याच्या शेजारी मोगली वंशज असणार्‍यांचा पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात आला. इतकेच नव्हे, तर भारतातच अशा वंशांचे अस्तित्व टिकून राहिले आणि ते येथील बहुसंख्य हिंदूंच्या अस्तित्वाच्या मुळावर उठले. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी प्रत्यक्ष ते करूनही दाखवले. काश्मीरमध्ये हिंदु औषधालाही शिल्लक ठेवला नाही. गेली ३ दशके भारतात जिहादी आतंकवाद चालू आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून त्याला काही प्रमाणात चाप बसला असला, तरी त्यांचे संपूर्ण निर्दालन झालेले नाही, तसेच जिहादी मानसिकतेच्या लोकांची संख्या न्यून झालेली नाही किंवा त्यांच्यावर वचक बसवण्याचा प्रयत्न केला गेला नाही. यामागे तथाकथित सर्वधर्मसमभाव नावाचा हिंदूंना आणि पर्यायाने भारताचा शत्रू आड आलेला आहे. याच्या नावाखाली आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदूंना धर्मांधांच्या आक्रमणामध्ये चिरडण्यास सोडून दिलेले आहे. यात आजही विशेष पालट झालेला नाही. देशातील अनेक मुसलमानबहुल भागातून आजही हिंदूंना पलायन करावे लागत आहे. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद आहे. या तुलनेत भारताच्या शेजारील देशांनी, उदा. म्यानमार आणि आता श्रीलंका यांनी कठोरपणे कृती करून जिहाद्यांचे नाक दाबले आहे किंवा तसा त्यांचा प्रयत्न चालू आहे. भारताने त्यांच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे. जर भारताने आता तसा प्रयत्न केला नाही, तर भविष्यात प्रयत्न करण्याची संधीही भारताला म्हणजेच हिंदूंना मिळणार नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

श्रीलंकेकडून शिका !

श्रीलंका प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे

श्रीलंकेमध्ये वर्ष २०१९ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी चर्च आणि हॉटेल्स यांमध्ये केलेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर तेथील सिंहली जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण होऊन त्यांनी धर्मांधांना लक्ष्य केले. अनेक मशिदी बंद करण्यास भाग पाडले. यानंतर सरकारने काही ठिकाणी बुरखा घालण्यावरही बंदी घातली. ‘जिहादी आतंकवादी मानसिकता नष्ट करण्यासाठी असे करावे लागेल’, असे त्यांच्या सरकारला आणि जनतेला वाटू लागल्याने त्यांनी अशा प्रकारची कृती केली. आता त्याही पुढे जाऊन संपूर्ण देशात बुरखाबंदी आणि मदरसे यांच्यावर बंदी घालण्याचा कायदा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात मुसलमानांचे मृतदेह दफन करण्यास बंदी घातली होती; मात्र विरोधानंतर ही उठवण्यात आली असली, तरी त्यांनी माघार घेतलेली नाही हे बुरखा आणि मदरसा बंदीच्या प्रयत्नावरून लक्षात येते. श्रीलंका हा बहुसंख्येने असलेल्या बौद्धांचा देश आहे. बौद्ध म्हणजे शांतता असे म्हटले जाते; मात्र सध्याचे कुठलेही बौद्ध देश एखाद-दुसरा अपवाद वगळता असे वागत नाहीत, हे चीन, म्यानमार यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. मग श्रीलंका तरी कशी मागे राहील ? याच श्रीलंकेने ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम्’च्या बंडखोरांचे निर्दालन करतांना सहस्रो निरपराध हिंदूंच्या हत्या केल्या होत्या, हे विसरता येणार नाही. प्राचीन काळापासून हा देश ‘सिंहल’ या नावाने ओळखला जात असे. त्याचा राष्ट्रीय ध्वज आणि चिन्ह यांवर सिंहाचे चित्र आहे. श्रीलंकेने धर्मांधांच्या विरोधात उचललेले पाऊल पहाता त्याला सिंहाचेच काळीज लागेल, असे म्हणावेसे वाटते. ‘जग काय म्हणेल ?’ असा जो भारतियांना नेहमीच प्रश्‍न पडतो किंवा त्या विचारांमुळे कोणताही निर्णय ते घेत नाहीत, ते पहाता श्रीलंकेला ‘जग काय म्हणेल ?’ याची कुठलीच भीती नाही, हे लक्षात येते. जर भारताला असे शासनकर्ते मिळाले असते, तर भारत आज एक महासत्ता ठरला असता. दुर्दैवाने देशात ढोंगी अहिंसावाद आणि गांधीगिरी निर्माण झाल्याने भारत ‘वाघांचा देश’ राहिलेला नाही. श्रीलंकेने बुरखा आणि मदरसा बंदीचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याला इस्लामी देशांकडून अद्यापतरी विरोध झालेला नाही. कदाचित् तो होऊ शकतो; मात्र श्रीलंका त्याला भीक घालण्याची शक्यता नाही. देशात एक जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर ते पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे हाच खरा राजधर्म आहे, हे श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांना कदाचित् चांगल्या प्रकारे ठाऊक असणार, यात शंका नाही.

संपूर्ण जग विरोधात !

वसीम रिझवी

जिहाद्यांची अनेक आक्रमणे झाल्यानंतर फ्रान्स सरकारने तेथे कठोर कायदा केला आहे. प्रत्येक देशाला त्याच्या जनतेचे संरक्षण करावेच लागते, तसे ते करत असतात; मात्र भारत याला अपवाद ठरत आला आहे. युरोपमधील अनेक देशांनी बुरख्यावर बंदी घातली आहे. बुरख्यामुळे जिहादी आतंकवादी त्याचा अपलाभ घेतात, तसेच तेे ‘कट्टरतावादाचे प्रतीक’ म्हणूनही मिरवले जाते, असे या सर्वांचे म्हणणे आहे. जनतेमध्येही जिहादी आतंकवाद्यांच्या कारवायांमुळे धर्मांधांविषयी संताप आहे. अमेरिकेतील ९/११ च्या आक्रमणानंतर तेथे अनेक मुसलमानांवर आक्रमणे झाली होती, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दोनच वर्षांपूर्वी न्यूझीलंडच्या २ मशिदींमध्ये गोळीबार करून अनेक मुसलमानांना ठार करण्यात आले होते, यामागेही असाच संताप होता. जगात आता कुणालाही जिहादी आतंकवाद नको आहे. म्हणून प्रत्येकच जण त्याच्या विरोधात उभा ठाकला आहे. त्यांना या आतंकवादामागील मानसिकता किंवा विचार कुठून येतात हेही लक्षात आले आहे. भारतात तर स्वतः शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून आतंकवादाला प्रोत्साहन देणारी कुराणातील २६ आयते काढून टाकण्याची मागणी केली आहे. यावर शेवटी न्यायालय निर्णय घेणार आहे. तरीही आता यावर चर्चा चालू झाली आहे. जगात सभ्य माणसांना शांतता, विकास आणि समृद्धता हवी आहे, तर यांच्या उलट आजही मध्ययुगीन काळात वावरणार्‍यांना अशांती हवी आहे. ते त्यांच्या देशांतही शांततेने राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. इंडोनेशियानंतर भारतात मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. यातील धर्मांध भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतच आले आहेत, हे रोखण्यासाठी आता श्रीलंका, म्यानमार आदींप्रमाणे कठोर होणे अपरिहार्यच ठरणार आहे, असे म्हणावेसे वाटते !