जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू विकास प्राधिकरणाने २० नोव्हेंबर या दिवशी शहरातील मुठी कॅम्पजवळील विस्थापित काश्मिरी हिंदूंची दुकाने पाडल्याने येथे आंदोलन केले जात आहे. प्राधिकरणाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता दुकाने पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही दुकाने ३ दशकांपूर्वी विस्थापित काश्मिरी हिंदूंनी बांधली होती.
१. प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, ही दुकाने आमच्या भूमीवर बांधली गेली होती. आयुक्त अरविंद कारवानी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पीडित कुटुंबांना आश्वासन दिले की, त्यांच्यासाठी परिसरात नवीन दुकाने उभारली जातील. ही दुकाने प्राधिकरणाच्या भूमीवर होती. मुठी कॅम्प फेज-२ मध्ये व्यापारी संकुल बांधण्यासाठी ‘राहत’ या संस्थेने निविदा काढल्या आहेत. लवकरच १० दुकाने उभारली जातील आणि या दुकानदारांना वाटप केले जाईल.
२. दुकानमालक कुलदीप किसरू म्हणाले की, आम्हाला अधिक चांगल्या सुविधा आणि आर्थिक साहाय्य करून जगण्यास साहाय्य करण्याऐवजी सरकारने बुलडोझरद्वारे आमची दुकाने उद्ध्वस्त करून आमची उपजीविका हिसकावली आहे.
३. दुकानदार जवालाल भट म्हणाले की, या दुकानांमधून मिळणार्या कमाईवर पूर्णपणे अवलंबून असतांना कुटुंबाचे पोट कसे भरणार ? आम्ही उप राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना हस्तक्षेप करून आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती करतो.
४. जवाहर लाल या आणखी एका दुकानदाराने या विध्वंसाला ‘गुंडगिरी’ असे संबोधले. दुकाने पाडण्यापूर्वी आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, असे ते म्हणाले.
संपादकीय भूमिका
|