चेन्नई सुपरकिंग्जच्या टी शर्टवरील मद्य आस्थापनाचा लोगो हटवण्याची क्रिकेटपटू मोईन अली यांची मागणी मान्य

इस्लाममध्ये मद्याला प्रोत्साहन देण्याची अनुमती नसल्याने केली होती मागणी !

मुसलमान त्यांच्या धर्माचे कठोरपणे पालन करतात. अशांकडून हिंदू काही शिकतील का ?

नवी देहली – इंग्लंडचे क्रिकेटपटू मोईन अली भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून खेळतात. या संघाच्या टी शर्टवर एका मद्य आस्थापनाचा लोगो असल्याने मोईन अली यांनी तो काढण्याची मागणी केली होती. चेन्नई सुपरकिंग्जच्या व्यवस्थापनाने ही मागणी मान्य करत लोगो हटवला आहे. मोईन अली मुसलमान आहेत आणि त्यांच्या धर्मानुसार मद्याला प्रोत्साहन देण्याची अनुमती नाही.