मुसलमानांना मिळालेल्या ५ एकर भूमीवर मशीद नाही, तर संशोधन केंद्र आणि ग्रंथालय उभारणार ! – सुन्नी वक्फ बोर्डाची अधिकृत घोषणा

श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांना दिलेल्या ५ एकर भूमीवर बाबर किंवा अन्य कुणाच्याही नावावर कोणतीही मशीद किंवा रुग्णालय बनवण्यात येणार नाही, तर तेथे संशोधन केंद्र आणि ग्रंथालय उभारण्यात येणार आहे…

इस्लामी देशांतून आलेल्या नागरिकांमुळे भारतियांना कोरोनाची अधिक प्रमाणात लागण झाल्याचे उघड !

भारतामध्ये ३० जानेवारी या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याला त्याची लागण होऊन तो केरळमध्ये परतला होता. आता सध्याच्या स्थितीत भारतात ८०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुसलमानांनी दळणवळण टाळून घरातच नमाजपठण करावे !

सध्याची स्थिती पहाता मशिदीमध्ये केवळ ४-५ जणांनीच जाऊन नमाजपठण करावे, तर उर्वरित मुसलमानांनी घरामध्येच नमाजपठण करावे, असे आवाहन बिहारमधील मुसलमानांच्या काही धार्मिक संघटनांनी केले आहे.

पाटलीपुत्र येथे मशिदीमध्ये रहात असलेले १२ विदेशी मुसलमान पोलिसांच्या कह्यात

बिहारच्या पाटलीपुत्र या राजधानीमधील एका मशिदीमध्ये  विदेशी मुसलमान असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा मारून १२ विदेशी मुसलमानांना कह्यात घेतले आहे. हे सर्व जण १२ मार्च या दिवशी येथे पोचले होते; मात्र त्याविषयीची कोणतीच कल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती…..