‘सी.एस्.टी.इ.पी’ या संशोधन संस्थेची गंभीर चेतावणी !

नागपूर – ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सी.एस्.टी.इ.पी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि ‘आयपीसीसी’च्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ ते २०५० या काळात महाराष्ट्रातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे, तसेच पावसाचे दिवस आणि अतीवृष्टीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होणार असून हा अभ्यास भविष्यातील धोक्याची घंटा मानली जात आहे.
हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी यांनी म्हटले आहे की, भारत देश आधीच नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात जगामध्ये तिसर्या क्रमांकावर आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. प्रदूषण असेच अनियंत्रित राहिले, तर वर्ष २०५० पर्यंत राज्याच्या विविध भागांत भीषण तापमान वाढ होणार आहे. अमरावती आणि संभाजीनगर येथे सर्वाधिक २.९ अंश सेल्सिअसने तापमान वाढेल.
यवतमाळ जिल्हा वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचे दिवस ३ ते ९ दिवसांनी वाढतील. सरासरी पावसाच्या वाढीमुळे धुळे, सातारा, सांगली, अहिल्यानगर आणि पुणे यांसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो; मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग, बुलढाणा, हिंगोली, कोल्हापूर आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतीवृष्टीच्या (१०० मिमी हून अधिक पाऊस) घटना घडतील.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !