४० ते ६० सहस्र रुपये शुल्क
आरोपी १२ वी उत्तीर्ण

पुणे – दौंड तालुक्यातील यवत पोलिसांनी गर्भलिंग निदान करणारी टोळी आणि या टोळीचे मुख्य सूत्रधार अण्णासाहेब गिरी यांना अटक केली आहे. लोहगाव भागातील एका आधुनिक वैद्यांसह साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्यात याविषयी एका आधुनिक वैद्यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. आरोपी गिरी यांनी गर्भलिंग निदान पडताळणीसाठी लागणारे यंत्र (सोनोग्राफी मशिन) घेतले होते. गिरी हे १२ वी उत्तीर्ण आहेत. गावोगावी जाऊन विनाअनुमती गर्भलिंग निदान करत होते. महिलांची आर्थिक स्थिती पाहून ते ४० ते ६० सहस्र रुपये घेत होते. आरोपीने गेल्या ५ वर्षांमध्ये अनेक महिलांची पडताळणी केल्याची माहिती मिळाली. पोलीस आयुक्त संदीपसिंह गिल म्हणाले, ‘‘मुख्य आरोपी गिरी १० ते १५ आधुनिक वैद्यांच्या संपर्कात होता. या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.’’ (या आधुनिक वैद्यांना शोधून त्यांनाही शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष