झांशी (उत्तरप्रदेश) येथील घटना

झांशी (उत्तरप्रदेश) – येथे एका चोराने माता मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरले. त्यानंतर त्याने हात जोडून दोन वेळा देवीची क्षमाही मागितली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. तो सध्या सामाजिक माध्यमांत वेगाने प्रसारित होत आहे.
In Jhansi, Uttar Pradesh, a thief who stole jewellery from a temple dedicated to a goddess posted a video of himself apologising after the theft went viral.#Jhansi #UP #Jewellery #Temple #IndiaTodayShorts pic.twitter.com/b6YMVPBneP
— IndiaToday (@IndiaToday) January 11, 2026
सौजन्य :IndiaToday
घटना झांशीच्या गरौठा परिसरातील गरौठा मढां मार्गावर असलेल्या मोठ्या माता मंदिरातील आहे. १० जानेवारीच्या रात्री ही चोरी झाली. अंधाराचा लाभ घेत चोराने प्रथम मंदिराचे कुलूप तोडले आणि त्यानंतर मातेला अर्पण केलेले मौल्यवान दागिने चोरले.
सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी भाविक मंदिरात आले असता तुटलेले कुलूप पाहून एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.
संपादकीय भूमिकाएखाद्याला पाप करत असल्याची जाणीवच नसणे यापेक्षा पाप करत असल्याचे लक्षात येऊनही ते कृत्य करणे, यास धर्माच्या दृष्टीने अधिक पातक लागते ! |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !