
मुंबई – मालाड येथील आकाशवाणीच्या (प्रसारभारतीच्या) जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब (माध्यम केंद्र)’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसारभारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश आस्थापन (एस्.पी.व्ही.) स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
या प्रस्तावित ‘मिडिया हब’मध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ (ध्वनीचित्रीकरण कक्ष), ‘साऊंड स्टेजेस’ (ध्वनीमुद्रण कक्ष), आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), आयटी आणि आय.टी.ई.एस्. क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रपट आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे.
१५० एकर क्षेत्रावरील या प्रकल्पासाठी प्रसारभारती, एम्.आय.डी.सी. आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफ्.एम्. प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !