देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पालखीला प्रारंभ

पुणे – श्री क्षेत्र देहू येथील ‘जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान’च्या वतीने आषाढी वारीचे वेळापत्रक घोषित केले आहे. ७ जुलै या दिवशी पालखी सोहळा मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करील. पालखीचे यंदाचे ३४१ वे वर्ष आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे विश्वस्त म्हणून ह.भ.प. विक्रमसिंह मोरे-देहूकर, ह.भ.प. उमेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण मोरे यांची निवड करण्यात आली.
१. १७ जुलै या दिवशी आषाढी एकादशीला पालखी पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येईल.
२. २९ जुलै या दिवशी पालखीचा परतीचा प्रवास चालू होऊन ९ ऑगस्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी पालखी श्री क्षेत्र देहू येथे परत येईल.
३. गेल्या वर्षी पालखी सोहळ्यात ३९५ दिंड्या सहभागी होत्या. पालखी रथापुढे ३० आणि उर्वरित दिंड्या रथामागे असा त्यांचा क्रम होता.
४. पालखीतील रथासाठी आणि चौघडा गाडीसाठी संस्थानने ३ बैल जोडी खरेदी केली आहे.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !