ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !

   शिर्डी – येथील ‘बी दी चेंज फाऊंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न पुरस्कार’ ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना देण्यात आला. त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. संजीव कुमार सुभेदार (मेजर निवृत्त) आणि प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता पगार यांच्या शुभहस्ते शाल, फेटा आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवरांना ‘महाराष्ट्र गुणगौरव’ आणि ‘सौंदर्य कला’ पुरस्कार देण्यात आले.

ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी हे ३० वर्षांहून अधिक काळ ‘स्पर्धा परीक्षा केंद्र’ या ठिकाणी कार्यरत असून ‘शोध प्रज्ञावंत’ या मोहिमेअंतर्गत अत्यंत हिरीरीने काम करत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक दर्जा सुधारावा यासाठी या केंद्राच्या वतीने ही परीक्षा घेतली जाते. स्पर्धा परीक्षेला सामोरे कसे जावे ? आणि त्या परीक्षेच्या दृष्टीने येणार्‍या काळात कशी सिद्धता करावी ? अन् मराठी युवक स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पाषाण येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मारुति मंदिराचे ते अनेक वर्षे विश्वस्त आणि पुजारी म्हणूनही काम पहात होते.