शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !

मुंबई – राज्य सरकारने घोषित केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ची कार्यवाही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि आवश्यकतेनुसार निकषांमध्ये पालट करणे यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांच्या कृषी कर्जाची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध रहावी यासाठी ‘सहकार स्टॅक’ ही स्वतंत्र डिजिटल प्रणाली विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यातील कर्जवाटप, कर्जमाफी आणि विविध योजना यांची कार्यवाही अधिक अचूक, तसेच पारदर्शक होण्यास साहाय्य होणार आहे. शेतकर्‍यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयानंतर सहकार विभागाने वरील शासन निर्णय जारी केला.