हिंदूंच्या पवित्र होळी सणाची चुकीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न
पणजी, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यातील अनेक नाईट क्लब्स, ‘रिव्हर क्रूझ’ आदी ठिकाणी होळीच्या पार्श्वभूमीवर ‘होळी पार्ट्यां’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘रेन डान्स’ (कृत्रिम पावसात नाचणे), ‘पूल पार्टी मॅडनेस’ (जलतरण तलावातील पार्टी मस्ती), ‘बॉलीवूड डिजे’, ‘इंडियन ढोल डान्स’ (भारतीय ढोल नृत्य) आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टीमध्ये बिअरचा अमर्यादित पुरवठा केला जाणार आहे, तसेच निरनिराळे मद्यही पुरवले जाणार आहे. या ठिकाणी ८ वर्षांवरील मुलांना सहभागी होता येणार आहे. यामुळे हिंदूंच्या पवित्र होळी सणाची चुकीची ओळख निर्माण होणार आहे. (मद्याच्या पार्ट्यांमध्ये अल्पवयिनांना सहभागी करून घेणे, ही बालसंरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हे कायद्याच्या विरोधातील कृत्य ठरू शकते. याचा शासन विचार करणार का ? – संपादक)
हिंदु धर्मियांचा पवित्र सण ‘होळी’ २ मार्च या दिवशी साजरा केला जाणार आहे. दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा संदेश देणारा हा उत्सव आहे; मात्र या पवित्र सणाला गालबोट लावण्याचा प्रकार गोव्यातील काही नाईट क्लब्सकडून केला जात आहे.
१. गोव्यातील ‘टीटोस होळी’, ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’, ‘मांडवी रिव्हर क्रूझ’ आदी ठिकाणी होळीच्या निमित्ताने या ‘होळी पार्ट्या’ होणार आहेत. यांची सामाजिक माध्यमांवर विज्ञापने प्रसारित केली जात आहेत.
२. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ला ६ डिसेंबरला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर होळी सणाचा वापर करून ‘होळी पार्ट्यां’मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अनुज्ञप्ती, अग्नीसुरक्षा नियम आणि ध्वनीप्रदूषण नियम यांचे पालन होते कि नाही ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (‘होळी पार्ट्यां’मध्ये ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची हमी शासन देऊ शकणार का? – संपादक)

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !