नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !

वाशी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत बालवाडीचे (‘नर्सरी’चे) वर्ग चालू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रवेशप्रक्रिया विनामूल्य आहे. एका वर्गात ३० विद्यार्थी मर्यादा असून शाळेत सर्व पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षक असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ५७ प्राथमिक शाळा चालवल्या जात आहेत. त्यांपैकी ५१ शाळांमध्ये खेळवाडी, बालवाडी आहेत. यातील ४३ मराठी, ७ हिंदी, १ उर्दू भाषिक आहे.