
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मक्रणपूर आणि रेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास जोंधळे (वय ५० वर्षे) यांना ४० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जूनला ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार किशोर वाळुंजे यांनी ‘नवबौद्ध घटक परिसर विकास योजने’अंतर्गत आंबेडकरनगर आणि कन्नड साखर कारखाना परिसरातील गौतमनगर अन् अण्णाभाऊ साठेनगर येथे एकूण १० लाख रुपयांचे पी.व्ही.आर्. ब्लॉक बसवण्याचे काम केले होते. हे काम पूर्ण होऊन २ महिने झाले, तरी जोंधळे त्याचे अंतिम देयक काढण्यास टाळाटाळ करत होते. हे देयक संमत करण्यासाठी जोंधळे यांनी ४० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर