गीतकार जावेद अख्तर यांनी ‘खुदा नाही’, असे म्हटले आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. तशीच हुक्की बहुधा अभिनेते वैभव मांगले यांना आली असावी. ‘खाज नास्तिकत्व सिद्ध करण्याची कि आणखी कशाची ?’, हे त्यांचे तेच जाणोत; पण प्रश्न देवाच्या नसण्याचा असला, तरी तो केवळ यांच्या नास्तिक असण्याचा निश्चितच नाही. मूळ भाषण मिळवण्याचा प्रयत्न केला; पण ते काही उपलब्ध होऊ शकले नाही. हरकत नाही; पण एकूण सूत्र देव, त्याचे अस्तित्व, लुबाडणारे नास्तिक भट, कामधंदा नसलेले असहिष्णु हिंदू वगैरे वगैरे.

१. धर्मातील चुकीच्या पद्धती मानल्या, तरी त्यावरून देवाचे अस्तित्व नाकारणे तर्कहीन !
‘भट’ नावाचा समाज इतकी सहस्रो वर्षे समस्त बहुजनांची लुबाडणूक करतो’, असे सांगितले जाते. यात नक्की अपमान कुणाचा आहे ? ‘देव अस्तित्वात नाही, तो पैसा कमावण्याचे साधन आहे’, हे भटांना कळते; पण किमान ८ सहस्र वर्षे बहुजनांना कळत नाही का ? बहुजन एवढीही बुद्धीमत्ता नसणारे आणि शेंड्या हलवत पूजा करणारे भट इतके बुद्धीमान कसे ? हा तर्क ज्या महाभागांना मान्य आहे, त्यांना ‘देव नाही, भट लुटारू’, हे मान्य होईल. ‘देवस्थाने केवळ भटांची पोटे भरण्याकरता’, असा एक युक्तीवाद मागे वाचनात आला होता. ‘देवस्थान केवळ भट चालवतात, भक्त तिथे लुबाडून घ्यायला येतात. त्यांच्या घरी देव नसतो. देवळातही केवळ देव, भट आणि लुबाडले जाणारे बहुजन एवढेच असतात. अन्य व्यवसायांत चालतात, तशाच लांड्यालबाड्या पौरोहित्यातही चालतात, यात काही दुमत नाही, असे मानले; पण त्याचा संबंध धर्म, संस्कृती आणि देवाचे अस्तित्व यांच्याशी लावणे तर्कहीन आहे.
२. ‘देव, गॉड, अल्ला नाही’, अशी थेट भूमिका नास्तिक ‘सेक्युलर’ (निधर्मी) आणि पुरोगामी का घेत नाहीत ?

‘देवाचे अस्तित्व नाही’, हा तर्क असेल, तर कुठल्याच पंथाचे बंधन असता कामा नये. त्याला हिंदु धर्मापुरते मर्यादित करून चालणार नाही. देव ही संकल्पना जगात सर्वत्र आहे. नास्तिक ‘देव नाही’ म्हणतात, तर आस्तिक ‘देव आहे’, असे म्हणतात. देव जसा हिंदूंचा आहे, तसाच तो ख्रिस्ती आणि मुसलमान यांचाही आहे. मग एकही नास्तिक ‘अल्ला अस्तित्वात नाही’, असे म्हणतो का ? अगदी जावेद अख्तरही ‘खुदा नाही’, असे म्हणतात, ‘अल्ला नाही’, असे म्हणत नाहीत.
‘आधी स्वत:चे घर स्वच्छ करतो, मग इतरांकडे पहातो’, हे म्हणणार्यांच्या हाती ‘झाडूऐवजी कुदळ दिसते, तेव्हा घर झाडायला नाही, तर पाडायला आले आहेत’, हे स्पष्ट होते. ‘आम्ही हिंदु आहोत, म्हणून देवाबद्दल बोलतो’, असा तर्क अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसारखे लोक लावतात. त्याच तर्काने जायचे, तर ‘हिंदु धर्मात जो देव सांगितला जातो, केवळ तोच अस्तित्वात नाही’, अशी स्पष्ट भूमिका घ्या ना. काहीच हरकत नाही. कुणीही काहीही म्हणणार नाही. नास्तिक असाल, तर स्पष्टपणे हे सांगा, ‘देव नाही, गॉड नाही आणि अल्लाही नाही. ‘भट, पाद्री आणि मुल्ला यांनी स्वत:ची पोटे भरण्यासाठी देव, गॉड आणि अल्ला यांना निर्माण केले’, असे सरळ अन् थेट विधान करा. एकही नास्तिक हे करणार नाही. अगदी तो इतर सर्व ठिकाणी ‘सेक्युलर’ (निधर्मी), पुरोगामी वगैरे असला तरीही !
३. अभिनेते वैभव मांगले ‘अल्ला नाही’, हे म्हणण्याचे धाडस दाखवतील का ?
अभिनेते वैभव मांगले जे ‘मला लोक मारतील’, अशी भीती व्यक्त करत आहेत, ती अनाठायी आहे. कुणीही हिंदू हा ‘देव नाही’, असे कुणी म्हटले; म्हणून त्याला मारणार नाही; पण खात्रीने सांगतो, हेच ‘अल्ला नाही, हे ठाऊक असूनही मुल्लांनी स्वत:ची पोटे भरण्याकरता त्याला आणि मशिदीला निर्माण केले’, असे जर मांगले म्हणतील, तर निश्चितच मरतील. त्यांनाही ते पक्के ठाऊक आहे. ‘स्वतःचे नास्तिकत्व केवळ हिंदूंपुरतेच ठेवायचे, त्याला अल्लापाशी, मुल्लापाशी आणि इस्लामपाशी न्यायचे नाही’, याची जाण त्यांना आहे.

४. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ‘विठ्ठला’ला पाहूनच ग्रंथनिर्मिती केली ना ?
‘हिंदु भक्त बेकार, बेरोजगार असतात, त्यांना काही कामधंदा नसतो’, हे सांगतांना मांगले यांनी स्वतःच्याच तर्काचे खंडण केले आहे. ज्याच्याकडे पाहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘पसायदान’ रचले, ज्याच्याकडे पाहून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ‘गाथा’ लिहिली, तो विठ्ठल त्यांच्यालेखी देव होता कि नव्हता ? देव नाहीच, तर मग नसलेल्या विठ्ठलावर त्यांनी साहित्य काय स्वत:ची पोटे भरायला रचले ? कि त्यांचाही लोकांना नादी लावण्याचा जोडधंदा होता ?
५. देव दिसावाच लागतो; म्हणून त्याला ‘दर्शन’ म्हणतात !
जसा देव आस्तिकास आठवतो, तसाच तो नास्तिकासही आठवतो; केवळ जागा वेगळी असते. आस्तिकाला तो भक्ती करतांना आठवतो, तर नास्तिकाला वाद घालतांना ! ‘सामान्य माणसाला देव कुठे आणि कशात दिसेल ?’, ते काही सांगता यायचे नाही. आईला तो बालमुखातून बोलतांना दिसतो, तर शेतकर्यास उंच पिकांमध्ये डोलतांना दिसतो; शेवटे ते ‘दिसणे’ आहे, ‘पहाणे’ नाही. पहायला गेला, तर देव कधीच दिसणार नाही; तो दिसावाच लागतो. म्हणूनच कदाचित् त्याला ‘दर्शन’ म्हटले असावे.
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.
संपादकीय भूमिकानास्तिकतावाद्यांची नास्तिकता, ही ख्रिस्ती किंवा मुसलमान नव्हे, तर केवळ हिंदूंच्या देवांपुरती सीमित असणे, हा त्यांचा दुटप्पीपणा ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी