Corporate Jihad Nashik : हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करण्याचे ३ मुसलमानांचे षड्यंत्र उघड !

नाशिकमधील आयटी क्षेत्रातील ‘कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – आयटी क्षेत्रातील नामांकित आस्थापनातील व्यावसायिक जिहाद प्रकरणातील एका पीडित हिंदु तरुणीने तिचा अनुभव सांगितला आहे. वर्ष २०२२ मध्ये तानिश शेख याने तिला मोठ्या आस्थापनात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून जाळ्यात ओढले. विवाहाचे स्वप्न दाखवून त्याने जवळीक साधली आणि ऑगस्ट २०२४ मध्ये एका उपाहारगृहात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या षड्यंत्रात तानिशसमवेत तौसिफ अख्तर आणि निदा खान यांचाही सहभाग होता. ‘तुझा धर्म चुकीचा आहे’, असे सांगून या त्रिकुटाने पीडितेचे वैचारिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तौसिफने पीडितेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण केले. फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडितेला समजले की, तानिश विवाहित असून त्याला २ मुले आहेत.

आयटी क्षेत्रात विशिष्ट विचारसरणीच्या लोकांमुळेच हिंदूंच्या शोषणाचा प्रकार !

आयटी क्षेत्रातील मोठ्या आस्थापनांमध्ये विशिष्ट समुदायाचे लोक महत्त्वाची पदे हस्तगत करत आहेत. त्या माध्यमातून हिंदु मुला-मुलींचे शोषण आणि धर्मांतर केले जात असल्याचा संशय आहे. गुणवत्तेला डावलून केवळ ओळखीच्या आधारावर विशिष्ट लोकांची भरती केली जात असल्याचे समोर येत आहे.

नाशिक हे ‘डिफेन्स हब’ (संरक्षण केंद्र) असल्याने या ‘कॉर्पोरेट जिहाद’ला परकीय निधी पुरवला जात असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून गोपनीय पद्धतीने देशातील मोठ्या शहरांमधील आस्थापनांच्या कागदपत्रांची छाननी चालू केली आहे.

संपादकीय भूमिका

  • हा केवळ लैंगिक शोषणाचा गुन्हा नसून हिंदु धर्म आणि देश यांच्या अर्थव्यवस्थेवर केलेला सुनियोजित आघात आहे. ‘व्यावसायिक जिहाद’च्या माध्यमातून आयटी आस्थापनांमध्ये घुसखोरी करणार्‍या जिहाद्यांचे कंबरडे मोडणे आवश्यक आहे.
  • हिंदु तरुणींनीही अशा लोकांपासून सावध रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे !