२ दिवसांत गोव्यात पोचणार
पणजी, ४ जून (वार्ता.) – भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मौसमी पावसाचे (मॉन्सूनचे) केरळमध्ये आगमन झाल्याचे घोषित केले आहे. पुढील २ दिवसांत मौसमी पाऊस गोवा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या भागांत सरकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ४ जून या दिवशी पणजी आणि गोव्यातील इतर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४ ते ७ जून या कालावधीत कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील मराठवाडा या भागांत ढगांचा गडगडाट आणि विजा अन् सोसाट्याच्या वार्यासह (४० ते ५० कि.मी. प्रतिघंटा) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान विभागाने २६ मे या दिवशी मौसमी पाऊस केरळमध्ये येईल, असा अंदाज वर्तवला होता; परंतु पावसाचे आगमन लांबले. या वर्षी देशात पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्के असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव