आजपासून संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला होणार प्रारंभ !

लोकशाहीच्या संसदेवर आतंकवादी आक्रमण झाले. हे आक्रमण आपल्या आत्म्यावर होते. ज्या सैनिकांनी आतंकवाद्यांशी लढतांना आपले रक्षण केले, त्यांनाही कधीच विसरता येणार नाही.

नवीन संसद भवनाच्या प्रांगणात फडकावण्यात आला राष्ट्रध्वज !

१९ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हालवण्यात येणार आहे. या दिवसापासूनच नवीन इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा झाला ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ !

औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव, तसेच उस्मानाबाद जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांचे नाव पालटण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र प्रकाशित करून पालटण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे ७ वर्षांनी मंत्रीमंडळाची बैठक

शहरात १७ सप्‍टेंबर या दिवशी म्‍हणजे ७ वर्षांनी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी रामा उपाहारगृहात मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री आणि सर्व मंत्री यांचे वास्‍तव्‍य असेल.

नेपाळ चीनच्या महामार्ग प्रकल्पात सहभागी होण्याच्या सिद्धतेत !

चीनच्या या प्रकल्पाला भारतासह जगातील अनेक देशांनी विरोध केला आहे, तर काही देश आता या प्रकल्पातून बाहेरही पडत आहेत.

मंत्रालयातील कामकाज ‘पेपरलेस’; मात्र सर्व विभागांमध्ये ‘फाईल्स’चे ढीग !

प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान आणि ‘पेपरलेस’ (कागदांविना) व्हावे, यासाठी १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस प्रणाली’ (संगणकीकृत कामकाज) चालू करण्यात आली आहे.

परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचा शासनाचा आदेश कागदावरच !

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अ‍ॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.

मंदिराच्या पायर्‍यांवर लावली उदयनिधी यांची छायाचित्रे !

ज्या व्यक्तीला सनातन धर्माविषयी इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीची छायाचित्रे मंदिराच्या पायर्‍यांवर लावण्याइतकीही तिची पात्रता नाही !

समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याच्या ३० ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या काही विश्‍वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्‍वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.

चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – लडाखचे उप राज्यपाल

आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.