एस्.टी.त तिकीटाचे पैसे आता ‘ऑनलाईन’ देता येणार !

एस्.टी.च्या बसगाड्यांमध्ये तिकीट देण्यासाठी ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’चा वापर केला जाणार आहे. येत्या दीड मासात राज्यातील १०० टक्के एस्.टी. गाड्यांमध्ये ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

देहलीत आजपासून ‘जी-२०’ परिषद !

देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

‘द्रमुक’ म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया यांसारखा प्राणघातक आजार !-भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई

निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’ 

खलिस्‍तानी आतंकवाद संपवण्‍यासाठी ब्रिटन भारतासमवेत ! – पंतप्रधान ऋषी सुनक

ऋषी सुनक यांनी असे केवळ म्‍हणू नये, तर प्रत्‍यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते !

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

संसदेच्या विशेष अधिवेशनाचा विषय न सांगितल्यावरून सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.

रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट सरकारकडे करण्यासाठी लवकरच ‘अ‍ॅप’ कार्यरत होणार !

रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि रस्त्यांची दुरुस्ती ही कामे त्वरित करावयाची असतात; मात्र ही कामे तत्परतेने केली जात नाहीत . नागरिकांना थेट सरकारकडे तक्रार करता यावी, यासाठी हे ‘अ‍ॅप’ बनवले जात आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !

फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे मत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

उदयनिधी यांच्या विधानावर उत्तर द्या !  

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘उदयनिधी यांच्या विधानावर योग्य उत्तर द्या. ते सहन करू नका’, असा आदेश दिला.