कर्तव्याचे पालन करतांना पोलिसांमध्ये नेहमी दिसून येणारी कर्तव्यचुकारता आणि कायद्याच्या पालनाविषयीची उदासीनता !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे २१ हॉटस्पॉट !

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवरही आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे !

(म्हणे) ‘भ्रष्टाचार हा कार्यपद्धतीचा भाग !’ – हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक

अशा भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच आजवर लक्षावधी लोक न्यायापासून वंचित राहिले, सहस्रो हिंदूंवर अन्याय झाले, शेकडो गुन्हेगार मोकाट सुटले आणि कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असेच कुणालाही वाटेल !

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

मृत्यूच्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांना ४५ ‘मिस्ड कॉल’ ! – चित्रा वाघ, भाजप

हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून सिद्ध !

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य आतंकवादी आक्रमणे आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी पुलामध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. पुलाची एकूण लांबी १ सहस्र ३१५ मीटर असणार आहे.

भाजपच्या नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक

भाजपचे नेते गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !

धार्मिक चित्रांच्या समोरच शौचालय उभारल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालय प्रमुखांनी अधिकार्‍यांना फटकारले !

कुंभमेळ्याच्या नियोजनात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भावभक्ती नसल्यानेच ते अशा प्रकारची कृती करत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्वच ठिकाणी साधना करणारे कर्मचारी आणि अधिकारी असतील !

नेपाळची संसद पुन्हा कार्यान्वित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

के.पी. शर्मा ओली यांनी पक्षांतर्गत राजकीय आव्हान मिळाल्यावर संसद विसर्जित केली होती.