भाजपच्या नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक

भाजपच्या महिला कार्यकर्त्याने कोकीन बाळगल्याचे प्रकरण

भाजपचे नेते अशा प्रकारच्या गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भाजपचे नेते राकेश सिंह

कोलकाता (बंगाल) – राज्यातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या पामेला गोस्वामी यांना कोकीन बागळल्याच्या प्रकरणी अटक केल्यानंतर भाजपचे नेते राकेश सिंह आणि त्यांची २ मुले यांना बंगालच्या पूर्बा वर्धमान जिल्ह्यातील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी राकेश सिंह यांना नोटीस बाजवली होती. त्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात पोलिसांच्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

त्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोचले. या वेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी राकेश सिंह यांच्यासह कारवाईमध्ये व्यत्यय आणल्यावरून राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलानांही अटक केली.