अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवरही आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे !

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या कंटेड हेड अपर्णा पुरोहित

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही. राज्यघटनेची निर्मिती करणार्‍यांचा उद्देश होता की, सर्व धर्मांचा सन्मान केला जावा. ज्या प्रकारे वेब सिरीजमध्ये धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष करत धर्माला लक्ष्य करतांना हिंदूंच्या देवतांविषयीची दृश्ये दाखवली जात आहेत, ते अत्यंत अयोग्य आहे, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘तांडव’ वेब सिरीजवरून ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या कंटेड हेड अपर्णा पुरोहित यांना फटकारले.

न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यासही नकार दिला. त्यामुळे त्यांना आता अटक होण्याची शक्यता आहे. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ या ओटीटी मंचावरून ‘तांडव’ वेब सिरीज प्रदर्शित करण्यात आली होती. यात हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याने पोलिसांचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.