धार्मिक चित्रांच्या समोरच शौचालय उभारल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालय प्रमुखांनी अधिकार्‍यांना फटकारले !

हरिद्वार कुंभमेळा !

कुंभमेळ्याच्या नियोजनात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात भावभक्ती नसल्यानेच ते अशा प्रकारची कृती करत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्वच ठिकाणी साधना करणारे कर्मचारी आणि अधिकारी असतील !

हरिद्वार (उत्तराखंड) – येथे कुंभमेळ्याची सिद्धता चालू असतांना अनेक ठिकाणी धार्मिक चित्रे रेखाटण्यासह लावण्यात आली आहेत; मात्र राजपथ येथे या चित्रांसमोरच १०० हून अधिक अस्थायी शौचालय उभारण्यात आली आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालय प्रमुखांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करत अधिकार्‍यांना फटकारले.