मृत्यूच्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांना ४५ ‘मिस्ड कॉल’ ! – चित्रा वाघ, भाजप

मुंबई – ज्या दिवशी पूजा चव्हाण यांचा मृत्यू झाला त्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांच्या भ्रमणभाषवर ४५ ‘मिस्ड कॉल’ करण्यात आले होते, असा दावा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

याविषयी चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी अन्य सक्षम पोलीस अधिकार्‍याची नियुक्ती करावी. पूजा चव्हाण मृत्यूचे अन्वेषण पुणे पोलिसांकडून काढून घेऊन एखाद्या सक्षम भारतीय सेवेतील अधिकार्‍याकडे द्यावे.’’

सौजन्य : Max Maharashtra