कोटी कोटी प्रणाम !

• वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव ! • श्री मोरया गोसावी पुण्यतिथी
• मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव
• सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस

आंध्रप्रदेशात आता सीतामातेच्या मूर्तीची तोडफोड !

प्रतिदिन राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होऊन मूर्तींची तोडफोड होत असतांना ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी शांत कसे राहू शकतात ? अशी घटना अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांविषयी झाली असती, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !

श्री हनुमानाला दंडवत घालत वानराने घेतला अखेरचा श्वास !

गुंडेवाडी (जिल्हा सांगली) येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील अद्भुत घटना !

राजस्थान येथील श्री देवनारायण मंदिराच्या भूमीपूजनासाठी दूध, दही आणि तूप अशी एकूण ११ सहस्र लिटर सामुग्री वापरल्याने प्रसारमाध्यांची टीका

हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ते कृती करत असतील, तर प्रसारमाध्यमांना पोटशूळ का उठतो ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्री युवा सेवासंघ पुणेच्या वतीने लोहगांव पुणे परिसरात ‘तुलसी पूजन’ आणि श्री गीता जयंती यांचे आयोजन

३१ डिसेंबरला भोगविलासात साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या तुळशीचे पूजन केव्हाही श्रेष्ठ आहे.

शिवभक्तांनी मानले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार

जिल्ह्यातील गड आणि किल्ले यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसला.

२६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – संदीप देशपांडे, मनसे

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत.

साटेली (दोडामार्ग) येथील श्री सातेरीदेवी, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव पुरमार यांचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली येथील श्री देवी सातेरी, श्री देवी शांतादुर्गा आणि श्री देव पुरमार या देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी (३ जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.

सांडपाण्याच्या नाल्यावर प्राचीन मंदिराचा स्तंभ ठेवण्यात आल्याचे छायाचित्र ट्विटर प्रसारित झाल्यावर हिंदूंचा संताप

हिंदूंच्या संतापानंतर प्रशासन, पोलीस आणि पुरातत्व विभाग सक्रीय – हिंदूंना त्यांच्या प्राचीन सांस्कृतिक ठेव्याचे मोल नसल्याने ते अशा प्रकारची कृती करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात ! तसेच सरकार, प्रशासन आणि पुरातत्व विभागही निष्क्रीय रहाते !