श्री युवा सेवासंघ पुणेच्या वतीने लोहगांव पुणे परिसरात ‘तुलसी पूजन’ आणि श्री गीता जयंती यांचे आयोजन

संतश्री आसाराम बापू यांच्याद्वारे प्रेरित

पुणे – संतश्री आसाराम बापू यांनी वर्ष २०१४ पासून ‘तुलसी पूजन दिवस’ साजरा करण्यास आरंभ केला होता. तसेच हिंदु धर्मावर श्रद्धा असणार्‍या प्रत्येकाने २५ डिसेंबर या दिवशी तुळशीचे पूजन करावे. त्यामुळे सगळीकडे भारतीय संस्कृतीचा प्रसार होईल, असे त्यांनी स्वत:च्या अनुयायांना सांगितले होते. त्यामुळेच श्री युवा सेवासंघ पुणेद्वारा लोहगांव पुणे परिसरात २५ डिसेंबर या दिवशी ‘तुलसी पूजन’ आणि श्री गीता जयंती यांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये २०० हून अधिक स्थानिक लोकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात पुणे हवेली तालुक्याचे सभापति श्री. बंदु खांडवेजी आणि ‘रिप्ाब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’, पुणे महिला अघाडीच्या अध्यक्षा सौ. सोनू खुडेजी उपस्थित होते. उपस्थितांना तुळस आणि श्री भगवद्गीता यांचे वितरण करण्यात आले.

२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत मद्यपान-धूम्रपान, आत्महत्या यांसारख्या घटना, मुली महिला यांची छेडछाड करणे, असे अपप्रकार होतात. त्यामुळेच आपली संस्कृती जपण्यासाठी पूज्य बापूजी यांनी २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत तुलसी पूजन, जप-माला पूजन, गौ पूजन, हवन, गौ-गीता-गंगा जागृति यात्रा, सत्संग आदी कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते.

(इंग्रजांची गुलामगिरी आणि अत्याचार यांचे प्रतीक असणारा आणि कोणताही आध्यात्मिक आधार नसलेला ३१ डिसेंबर भोगविलासात साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या तुळशीचे पूजन करण्याचा हेतू ठेवून तुलसी पूजन दिवस साजरा करणे केव्हाही श्रेष्ठ आहे. – संपादक)