शिवभक्तांनी मानले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार

३१ डिसेंबरच्या निमित्ताने गस्त वाढवली !

गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांना पुस्तक भेट देतांना शिवभक्त

सातारा, २ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट ३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षित रहावेत यासाठी जिल्ह्यातील शिवभक्तांनी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांना निवेदन दिले होते. यावर कारवाई करत सातारा पोलीस दलाला योग्य ते आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील गड आणि किल्ले यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसला. याविषयी धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि त्यांना पुस्तक भेट दिले.