‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत.

Denigration Of Shri Hanuman : ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया’ असा व्हिडिओ स्टेटस व्हाट्सअ‍ॅपवर ठेवणार्‍या धर्मांधाला अटक !

धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने वैध मार्गाने कृती करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन. असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची शक्ती !  

अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

देशात समाज आणि संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थानांचे रक्षण होणे अत्यावश्यक ! – डॉ. प्रभाकर कोरे, कार्याध्यक्ष, के.एल्.ई. संस्था, बेळगाव

कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !

गोवा : अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह महापालिकेने तात्काळ बंद करावे !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?

Chikalthana StonePelting By Muslims : चिकलठाणा येथे सलग दुसर्‍या दिवशीही महाआरतीनंतर धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !

धर्मांधांना प्रार्थनेची वेळ पालटून दिल्यानंतरही ते पुन्हा हिंदूंवर दगडफेक कशी करतात ? यातून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे का ? अशी शंका येते.

पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांचे निलंबन मागे घ्या !

देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत ! – विनायक येडके, अध्यक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना

सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्‍यांनाही हे लक्षात येत नाही का ?

हिंदु देवतांविषयी अपशब्द उच्चारणार्‍या ग्रामसेवकाविरोधात हिंदु संघटनांकडून तक्रार प्रविष्ट !

जामशेत आंबेसरी गावातील गरीब हिंदु आदिवासी बांधवांना एकत्रित करून हिंदु धर्मातील देवतांविषयी घाणेरडे आणि अश्लील शब्द वापरणे, हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणे आणि धर्मांतरासाठी प्रोत्साहन देणे, असे आरोप हिंदु संघटनांनी ग्रामसेवकांवर केले आहेत.