पालघर येथील प्रकार !
पालघर – येथील ग्रामसेवक गणपत गवळी यांच्या विरोधात वाणगांव पोलीस ठाण्यात हिंदु संघटनांच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. जामशेत आंबेसरी गावातील गरीब हिंदु आदिवासी बांधवांना एकत्रित करून हिंदु धर्मातील देवतांविषयी घाणेरडे आणि अश्लील शब्द वापरणे, हिंदु धर्माविषयी द्वेष पसरवणे आणि धर्मांतरासाठी प्रोत्साहन देणे, असे आरोप हिंदु संघटनांनी ग्रामसेवकांवर केले आहेत. ग्रामसेवकांचा निषेध करत येथील विविध हिंदु संघटनांनी एकत्र येत वाणगाव पोलीस ठाण्यात ग्रामसेवक गणपत गवळी यांच्याविरोधात तक्रार केली. श्रीराममंदिर महाआरती समूह, केसरी समूह, गुढीपाडवा स्वागत समिती या संघटनांचा यात समावेश होता. या वेळी सर्वश्री निवृत्ती जोशी महाराज, राहुल चुरी, शेरबहादूर यादव, आशुतोष दुबे, स्वप्नील दवणे, कौशिक, बर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.