हिंदुत्वनिष्ठांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कृती
मिरज – येथील साहिल गौस पटेल (रा.मुजावर गल्ली, मिरासाहेब दर्ग्यामागे, मिरज) या धर्मांधाने ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’ (बजरंग बलीने इस्लाम स्वीकारला आहे), अशा आशयाचा व्हिडिओ असणारा ‘स्टेटस’ व्हाट्सअॅपवर १६ आणि १७ मार्च या दिवशी ठेवला होता. या व्हिडिओमध्ये एका माकडाने गोल टोपी घालून वाकल्याचे (नमाजपठण करत असलेले) दृष्य होते.
माकड अथवा वानर यास हिंदु धर्मीय श्री हनुमानाचे प्रतीक मानतात. या स्टेटसमुळे समस्त हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ परिवार यांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली. साहिल याला अनेक वेळा विनंती करूनही त्याने संबंधित व्हिडिओ हटवला नाही. त्यामुळे सर्वश्री अभिषेक पाटील, राकेश कोळी, संतोष शहापूरकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव आणि अन्य अनेक धर्माभिमानी यांनी त्याच्या विरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी रितसर तक्रार नोंदवली. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने त्याला अटक करण्यात आली आहे. या धर्मांधांस तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील चौकशी चालू आहे.
धर्मांधांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरू ! – बजरंग दलहिंदूंच्या भावना पायदळी तुडवणारे असे स्टेटस ठेवून सामाजिक माध्यमाद्वारे दुफळी माजवून सातत्याने येथील वातावरण बिघडवण्याचे धर्मांधांकडून हेतूपुरस्सर प्रयत्न होत आहेत. अशा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी आणि सामाजिक शांतता राखण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी चेतावणी बजरंग दलाच्या वतीने देण्यात आली. |
(WARIS MEWATI OFFICIAL)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे !‘दैनिक प्रतिध्वनी’ वगळता अन्य वृत्तपत्रे आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी ही बातमी प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ केली आहे, असे समस्त हिंदु परिवाराने, तसेच हिंदु संघटना यांच्यावतीने सांगण्यात आले. (हिंदूंवर होणार्या अत्याचारांना वाचा न फोडणार्या आणि धर्मांधांच्या कुकृत्यांवर प्रकाश न टाकणार्या प्रसारमाध्यमांवर भविष्यात हिंदूंनी बहिष्कार टाकल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक) |
संपादकीय भूमिकाधर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने वैध मार्गाने कृती करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन. असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची शक्ती ! |