ध्वजसंहिता डावलून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. देवतांची विटंबना करणार्‍यांवर वचक बसावा यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.

सनदशीर मार्गांनी केलेल्या प्रयत्नांना ईश्वरी साहाय्य मिळते ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मप्रेमींची विदर्भस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत …

हिंदु धर्म, देवता आदींचा होणारा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा कायदा करा !

गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, चित्रपट, विज्ञापने आदींच्या माध्यमांतून हिंदु देवता, साधू, संत आदींचा अवमान करण्यात येत आहे. याचा हिंदूंकडून विरोधही केला जात आहे; मात्र कठोर कायदा नसल्याने आरोपींवर कठोर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत.

सातारा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी एक कृती समिती स्थापन करावी. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करावा अशी विनंती आहे.

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मंत्री शहा आणि जावडेकर यांना देण्यासाठीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री गजानन मुंज, सुरेश दाभोळकर, रामकृष्ण कुलकर्णी आणि रवींद्र परब उपस्थित होते.

उत्तम युवा संघटक, ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, अशी तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर !

उद्या ‘पौष शुक्ल पक्ष एकादशीला हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये …

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी नगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन 

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला !

‘तांडव’ वेब सिरीजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. हिंदु देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला !