‘पौष शुक्ल पक्ष एकादशी (२४.१.२०२१) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. निरंजन चोडणकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. आनंदी
‘निरंजनदादा नेहमी हसतमुख आणि आनंदी असतो. मी त्याला कधी गंभीर राहून विचार करतांना पहिले नाही. तो स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंदी ठेवतो.
२. सेवाभाव
अ. ‘कोरोना’महामारीमुळे सध्या दादा बाहेर जाऊन प्रसाराची सेवा करत नाही. तो ‘ऑनलाईन’ प्रसार करतो. तो ही सेवाही परिपूर्ण करतो.
आ. दादा आश्रमात असतांना आश्रमातील सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर असतो.
३. उत्तम युवा संघटक
अ. दादा एक उत्तम युवा संघटक आहे. तो आणि त्याचे सहसाधक वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन शौर्यजागृती वर्ग घेतात.
आ. दादा रामनाथी आश्रमात आल्यावरही साधकांसाठी शौर्यजागृती वर्ग घेतो. तो साधकांकडून निरनिराळे भावप्रयोग करवून घेतो. तो साधकांना शौर्य जागृत करणार्या गोष्टी सांगतो आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व सांगून साधकांमधील क्षात्रतेज जागृत करतो.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
निरंजनदादा व्यष्टी साधनेचे लिखाण, आत्मनिवेदन आणि भावजागृतीचे प्रयोग आदी कृती नियमित करतो. त्याला त्रास होत असला, तरीही त्यावर तो क्षात्रवृत्तीने मात करून प्रयत्न करतो.
५. अनुसंधानात असणे
आम्ही त्याच्याशी बोलायला गेल्यावर तो नेहमी साधनेविषयीच सांगतो. तो नेहमी आम्हाला साधनेच्या प्रयत्नांविषयी विचारतो. आम्हाला काही अडचण असल्यास त्यावर ‘काय प्रयत्न करायचे ?’, हेही तो सांगतो. तो सतत ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात असतो’, असे वाटते.
६. सेवेचा ताण आल्यास आध्यात्मिक उपाय सांगणे आणि त्यानंतर देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगणे
एकदा मी दादाला सांगितले, ‘‘मला एका सेवेचा पुष्कळ ताण येतो.’’ तेव्हा दादाने मला सांगितले, ‘‘तुला ज्या सेवेचा ताण येतो, त्या सेवेविषयी तू एका कागदावर लिहून त्याला श्रीकृष्णाच्या नामाचे मंडल घाल. तो कागद ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथात ठेव.’’ मी तसे केल्यावर दुसर्या दिवशी ही सेवा करतांना मला जराही ताण आला नाही. माझी ती सेवा वेळेत पूर्ण झाली. तेव्हा मला दादाप्रती कृतज्ञता वाटली. मी त्याला याविषयी सांगितल्यावर त्याने मला विचारले, ‘‘तू देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केलीस का ?’’ त्यानंतर मी कृतज्ञता व्यक्त केली.
७. ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, अशी तळमळ असणे
एक दिवस मी दादाला सांगितले, ‘‘आज दिवसभरात माझे व्यष्टी साधनेचे काहीच प्रयत्न झाले नाहीत.’’ तेव्हा त्याने मला तत्त्वनिष्ठ राहून सांगितले, ‘‘तू साधनेचे प्रयत्न प्रतिदिन केलेच पाहिजेत. आपल्याला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. तू तुझ्या मनातील अयोग्य विचार आणि अयोग्य कृती एका लहान वहीत लिहून ठेवू शकतेस किंवा भ्रमणभाषवरही चुका टंकलिखित करून ठेवू शकतेस. तू नियमित आत्मनिवेदन कर. देवाशी बोल.’’ दादा त्याच्या संपर्कात येणार्या सर्वच साधकांना तळमळीने साधनेचे प्रयत्न वाढवण्यास सांगतो. त्याला ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, असे वाटते.
‘अनेक उत्तमोत्तम गुण असलेल्या निरंजनदादाची लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती होऊन त्याने संतपद गाठावे’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतेे.’
– कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२१)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |