केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि धर्मांतराला अवैध ठरवावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. केवळ धर्मांतरापुरता हा विषय मर्यादित नसून पूर्ण भारताला आपल्या अधीन करण्याचे हे षड्यंत्र आहे.

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने तात्काळ हिंदूंचे रक्षण करून त्यांना पलायन करण्यापासून परावृत्त करावे !

हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येच्या फलकावरून पोलिसांनी मुंबईतील श्रीरामनवमीची शोभायात्रा रोखून धरली !

‘धार्मिक दंगली होतील’ म्हणून शिवछत्रपतींचा अफझलखानवधाचा पराक्रम महाराष्ट्रात झाकतात. उच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या आदेशाची कारवाई करण्यासही न धजावणाऱ्या पोलीसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?

हिंदु महासंघाकडून मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात निषेध आंदोलन !

येथील कात्रज तलावाच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून हिंदु महासंघाने मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या विरोधात १० एप्रिल या दिवशी आंदोलन केले.

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा कायदा असूनही उद्दाम धर्मांध हे हिंदु मुलींची फसवणूक करतच आहेत. यावरून त्यांच्यात धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !

‘इंस्टाग्राम’वर धर्मांधाची हिंदु मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याची धमकी !

८० कोटी असलेल्यांना ‘अल्पसंख्य’ म्हणवल्या जाणार्‍या समाजाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळणारा जगातील एकमेव देश भारत !

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.

आज सानपाडा येथे हिंदु वस्तीत मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती रहित करण्यासाठी हिंदूंकडून उपोषण !

हिंदूबहुल देशात हिंदूंना आंदोलन करून त्यांची न्याय मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून याविषयी पावले का उचलत नाही ?

जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भात ठोस धोरण आखा !

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?