संबलपूर (ओडिशा) येथे हिंदूंच्या दुचाकी फेरीवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

फेरीमध्ये १ सहस्र दुचाकीधारक सहभागी झाले होते. ते ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा देत असतांना मशिदीजवळ २०० धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण करत शिवीगाळ केली.

पुणे येथील पेशवेकालीन तुळशीबागेत हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा

श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे आणि दागिने घालण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली.

भारतात हिंदूंचे सण पोलीस बंदोबस्तात का साजरे करावे लागतात ? – ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’चा प्रश्‍न

भारतात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणानंतर हनुमान जयंतीच्या मिरवणुकांना संरक्षण देण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे ट्वीट करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड येथे हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन !

हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत घाटकोपर, चेंबूर, गोरेगाव आणि नवी मुंबईत सानपाडा आणि आंग्रोळी गाव येथे गदा पूजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात वावे येथे, तर ठाण्यामध्ये पिंपळपाडा आणि नालासोपारा येथे गदापूजन करण्यात आले.

श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात ८०० ठिकाणी गदापूजन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा शौर्य जागृत करणारा उपक्रम !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना अटक आणि सुटका !

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण केले जाते म्हणून कधी त्यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केल्याचे ऐकले आहे का ? पोलीस जर असे तत्परत असते, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर एकही आक्रमण झाले नसते !

देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी !

केवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका हिंसाचाराच्या सावटाखाली काढाव्या लागतात, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

अमित शहा यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या ५४ फूट उंच मूर्तीचे अनावरण !

ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून ती ३० सहस्र किलो वजनाची आहे. ही मूर्ती ७ किलोमीटर अंतरावरूनही दिसते. ही मूर्ती बनवण्यासाठी ६ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात आले आहेत.

बंगाल पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करा ! – कोलकाता उच्च न्यायालय

मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्‍न विचारला.

हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, सण शांततेत साजरा करावा आणि समाजामध्ये धार्मिक सद्भाव बिघडवणार्‍यांवर लक्ष ठेवावे, असे यात म्हटले आहे.