हिंदु समाजाला धर्मरक्षणासाठी सातत्याने स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन रायगडावर स्थापित होणे आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

पू. भिडेगुरुजी भाग्यनगर येथे ३२ मण सुवर्ण सिंहासन प्रतिष्ठापनेच्या संदर्भात बोलत होते.

पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही सेवा भावाच्या स्तरावर करण्यासाठी साधकांना केलेले मार्गदर्शन  !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही सेवा भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन…

ज्या क्षणी आपल्या जीवनात गुरूंचा प्रवेश होतो, त्या क्षणापासून प्रतिदिन आनंदाची दिवाळीच असते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !

हिंदूंनो, चित्रपट आणि मालिका यांत देवी-देवता म्हणून अभिनय करणार्‍यांची पूजा करू नका !

‘हिंदूंनी दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपट यांमध्ये देवी-देवतांचा अभिनय करणार्‍या अभिनेत्यांच्या चित्रांची देवाच्या रूपात पूजा करू नये. आज ते देवी-देवता म्हणून काम करतील, उद्या कुणी अधिक पैसे दिले, तर ते कोणा दुष्ट व्यक्तीचे पात्र ही साकारतील !

वडिलांचे निधन झाल्यावर ‘श्रीकृष्णाने पुष्कळ सावरले’, याची अनुभूती घेणारी कु. सायली देशपांडे !

सायलीच्या वडिलांचे निधन झाले. ‘या दुःखद प्रसंगात सायलीने (वय १२ वर्षे) श्रीकृष्णाशी बोलून स्वतःला कसे सावरले ?’, ‘तिची श्रीकृष्णावरील श्रद्धाच तिला मानसिक बळ देऊन गेली’, हेच यातून शिकायला मिळते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आणि साधनेचे प्रयत्न वाढवणे, हीच खरी दिवाळी ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने समस्त हिंदू बांधवांसाठी आयोजिलेल्या एका विशेष ऑनलाईन सत्संगात जिज्ञासूंना सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी संबोधित केले.

‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न गतीने व्हावेत’, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना काढणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु दादा त्यांच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करवून घेतात. ‘हे प्रयत्न ते कसे करवून घेतात ?’, याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

रामनाथी आश्रमात रहाणारी दैवी बालसाधिका कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कु. सायली देशपांडे ह्या दैवी बालसाधिकेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच तिचा लहान भाऊ कु. श्रीनिवास याचीही पातळी १ टक्क्याने वाढून ती ६२ टक्के झाली.

सनातनचे पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेल्या ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’चा ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आलेला प्रसार !

गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या लेखात ग्रंथ अभियानाचा प्रसार ‘व्हॉट्सॲप’ आणि सामाजिक माध्यमे (‘सोशल मिडिया’) यांच्या माध्यमातून कसा केला ? ते आपण पाहूया.

सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपेक्षा धर्मशिक्षण, धर्मपालन अन् साधना यांच्या बळावरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !

‘हिंदु राष्ट्र’ हे धर्मशिक्षण, धर्मपालन आणि साधना या बळावरच स्थापन होणार असल्याने त्यासाठी संत आणि गुरु अशा आध्यात्मिक अधिकारी जनांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्‍या त्यागी, निःस्वार्थी साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जिवांची आवश्यकता आहे.’