सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत पू. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) !
पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.