देशभरात हलालवर बंदी घालण्‍यात समितीचा ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ आघाडीवर असेल ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बेंगळुरू (कर्नाटक) येथे दोन दिवसांचे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ पार पडले !

दीपप्रज्वलन करतांना (डावीकडून) लेखक डॉ. एस्.आर्.लीला, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि युवा ब्रिगेडचे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलिबेले

बेंगळुरू – हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेला ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ देशभरात हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालण्‍यात आघाडीवर असेल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. समितीच्‍या वतीने येथे २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ आयोजन करण्‍यात आले होते. या अधिवेशनाला सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्‍थिती होती. या अधिवेशनाला राज्‍यभरातून विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

श्री. रमेश शिंदे

या अधिवेशनाच्‍या प्रारंभी सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, लेखिका डॉ. एस्.आर्. लीला, श्री. रमेश शिंदे आणि युवा ब्रिगेडचे संस्‍थापक श्री. चक्रवर्ती सुलिबेले यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. या अधिवेशनामध्‍ये लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद, हिंंदु मंदिरांचे रक्षण, धर्मशिक्षणाची आवश्‍यकता, तसेच जिहादी आणि धमद्रोही या शक्‍तींशी वैध मार्गाने लढा देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून विविध वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले.