सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘तिसर्‍या महायुद्धाचा काळ जवळ येत आहे. ‘महायुद्धाच्‍या काळात आपण कुठे असू’, हे सांगता येत नाही. आपण आतापासून तळमळीने साधना केली, तर त्‍या काळातही देव आपले रक्षण करील !

२. आपण संतांची भेट होण्‍यासाठी प्रार्थना करतो. त्‍यांची भेट झाल्‍यावर आपण त्‍यांनी सांगितलेली साधना तळमळीने करून त्‍यांचा लाभ घ्‍यायला हवा !

३. नवरा-बायकोचे (मायेतील व्‍यक्‍तींचे) मन जिंकणे कठीण आहे. त्‍यामुळे आपण देवाचे मन जिंकण्‍यासाठी प्रयत्न, म्‍हणजे साधना करायला हवी !

४. काही साधकांना ‘गुरूंच्‍या छायाचित्रापेक्षा त्‍यांच्‍या पादुकांकडे पहावेसे वाटते’, हे त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे !

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले