गोवा : म्हापसा येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संशयित धर्मांध ख्रिस्त्यांची स्वीकृती

शिवप्रेमींनी पोलिसांना सात दिवसांचा अवधी दिला होता; मात्र पोलिसांनी प्रकरण घडल्यानंतर २ दिवसांतच संशयितांना कह्यात घेतले. संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी शिवप्रेमींचे आभार व्यक्त केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी २४ ऑगस्टला गोव्यात

काही दिवसांपूर्वी गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना, पाद्रयाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान, ‘आप’च्या आमदाराचे विधानसभेत शिवजयंतीच्या खर्चावर आक्षेप घेणे, या पार्श्‍वभूमीवर पू. भिडे गुरुजी यांचे मौलिक असे मागदर्शन गोव्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे.

गोवा : ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजनासाठी अर्ज

पाश्‍चात्त्य संगीत कर्कश असल्याने ध्वनीप्रदूषण करणारा आणि अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव कधी रहित होणार ? शासनाने शीघ्रतेने नैसर्गिक पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटन यांना प्रोत्साहन देऊन पाश्‍चात्त्यांचे महोत्सव बंद करावेत आणि गोव्याची जगात चांगली पत निर्माण करावी !

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून उत्तर गोव्यात ‘रेव्ह पार्ट्यां’द्वारे ध्वनीप्रदूषण

पोलिसांचे साटेलोटे असल्याविना अशा प्रकारे न्यायालयाचा आदेश डावलून पार्ट्या होणे शक्य आहे का ? एकतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे क्लबवाल्यांशी साटेलोटे असल्याने पोलिसांवर दबाव आहे किंवा पोलीस लाचखोर आहेत, असेच म्हणावे लागेल.

चिपळूण येथे मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

मागील १० वर्षांत या मार्गावर २ सहस्र ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामावर आजपर्यंत साडेपंधरा सहस्र कोटी रुपये व्यय झाले आहेत, तरीही या महामार्गाचे काम अपूर्णच आहे.

गोवा : ‘पेपर स्प्रे’चा वापर करणारे ५ विद्यार्थी विद्यालयातून एक मासासाठी निलंबित

या प्रकरणाची विद्यालयाच्या शिस्तपालन समितीने गंभीर नोंद घेऊन या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. अन्वेषणानंतर दोषी आढळणार्‍या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत या समितीने दिले आहेत.

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत छोट्या चर्चसमोर देवीच्या मूर्तीची स्थापना

पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.

गोवा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.

शिवप्रेमींच्या वतीने गोवा राज्यभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ !

म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर शिवप्रेमींनी गोवाभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाची सांगता फर्मागुडी, फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महादुग्ध-जलाभिषेक करून होणार आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला अटक आणि सुटका 

सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गोवा रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील देशपांडे याच्या दुकानात धाड टाकली.