पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त होणार !

मुंबई – पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये प्रवाशांच्या साहाय्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त केल्या जाणार आहेत. ‘हवाई सुंदरी’ यांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवनेरी सुंदरी’ ही संकल्पना राबवली जाणार आहे, अशी माहिती एस्.टी. महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त एस्.टी. महामंडळाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहितीही गोगावले यांनी दिली.