|
बरेली (उत्तरप्रदेश) – लोकसंख्येत पालट करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवणे हा ‘लव्ह जिहाद’चा मुख्य उद्देश आहेे. धार्मिक गटातील मूलतत्त्ववादी गटांपासून तो प्रेरित आहे. मुसलमानेतर महिलांना फसव्या विवाहाद्वारे इस्लाममध्ये धर्मांतरित केले जात आहे. ‘लव्ह जिहादच्या घटना परदेशी अर्थपुरवठ्यामुळे घडत आहेत’, असे सांगत येथील जलद गती न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांनी ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात आरोपी महंमद आलिम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधिशांनी त्यांच्या ४२ पानांच्या आदेशात ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप, उद्देश आणि वित्तपुरवठाही स्पष्ट केला.
“Love J!had incidents occur due to foreign funding!”
– Judge Ravi Kumar of the Fast Track Court in Bareilly (Uttar Pradesh)The accused in the Love J!had case has been sentenced to life imprisonment.
This is the first court in the country that has acknowledged Love J!had,… pic.twitter.com/Yz3JdlVQa3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 2, 2024
न्यायाधीश रविकुमार दिवाकर निकाल देतांना म्हणाले की,
१. हे प्रकरण लव्ह जिहादच्या माध्यमातून अवैध धर्मांतराचे आहे. अशा परिस्थितीत सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय ? लव्ह जिहादमध्ये एका विशिष्ट समाजातील पुरुष दुसर्या समाजातील महिलांना लग्नाच्या माध्यमातून त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी पद्धतशीरपणे लक्ष्य करतात. एका विशिष्ट समाजाचे हे लोक प्रेमाच्या बहाण्याने धर्मांतर करण्यासाठी या महिलांशी लग्न करतात, जे खोटे असते.
२. लव्ह जिहादद्वारे महिलांचे अवैध धर्मांतर काही कट्टरतावादी व्यक्तींद्वारे केले जाते. हे लोक एकतर अशा कृत्यांमध्ये गुंतलेले असतात किंवा त्यांना पाठिंबा देतात. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या कृती संपूर्ण धार्मिक समुदायाला प्रतिबिंबित करत नाहीत.
३. ‘लव्ह जिहाद’ प्रक्रियेत जो निधी वापरला जातो, तो विदेशातून पाठवला जातो.
४. पाकिस्तान आणि बांगलादेश यांप्रमाणेच भारताला अस्थिर करण्याचा कट रचला गेला आहे. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांना याद्वारे धोका आहे.
काय आहे प्रकरण ?
आरोपी महंमद आलिम याने वर्ष २०२२ मध्ये पीडितेला स्वतःचे नाव आनंद असल्याचे सांगून फसवले आणि हिंदु रितीरिवाजाप्रमाणे लग्न करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर छायाचित्र आणि व्हिडिओ बनवून अपकीर्ती करण्याची धमकी देऊन अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. मे २०२३ मध्ये ही गोष्ट उघडकीस आली.
कोण आहेत न्यायाधीश रविकुमार दिवाकर ?
न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात असतांना काशी विश्वनाथ मंदिराजवळील ज्ञानवापीचे व्हिडिओग्राफिक सर्वेक्षण करण्याचा आणि तेथील वजूखान्याला (मशिदीत नमाजपठणापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) वर्ष २०२२ मध्ये टाळे ठोकण्याचा निर्णय दिला होता.
संपादकीय भूमिकादेशातील हे पहिलेच न्यायालय आहे,ज्याने लव्ह जिहाद असल्याचे मान्य करत त्याची व्याख्या करून आरोपीला जन्मठेप सुनावली. कायद्याच्या चौकटीत राहून असे केले जाऊ शकत होते, तर ते यापूर्वीच्या खटल्यांमध्ये का केले गेले नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो ! |