
मुंबई – मुंबईतील नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याविषयी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचे स्थानांतर करण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घातले असून सखोल चौकशीचा आदेश दिला आहे.
आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात येईल. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
‘युवान’ ही युवकांसाठी प्रेरणादायी चळवळ ! – प्रा. डॉ. रजनीश कामत, कुलगुरु
बनावट औषधे आणि इंजेक्शने विकणार्यांवर कारवाई होत नसल्याने सदस्य संतप्त !
छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचे खरे राष्ट्रपिता ! – श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले
कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणांच्या अपवापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार !
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !