राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २२ ऑगस्ट या दिवशी दुपारी गोवा दौर्‍यासाठी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

नामांतराची आवश्‍यकता !

परकीय संस्‍कृतीच्‍या खुणा पुसून टाकण्‍याची एकही संधी शासन आणि नागरिक यांनी सोडू नये ! हिंदू महारक्षा आघाडीने उपस्‍थित केलेले हे सूत्र देशभक्‍त गोमंतकीय आणि भाजप शासन उचलून धरेल अन् आणखी एक परकीय जोखड या भारतभूच्‍या अंगावरून दूर फेकले जाईल आणि संस्‍कृती जोपासण्‍याचा प्रयत्न करील अशी आशा करूया !

व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करून म्हादई वाचवा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई जलविवाद लवादाने कर्नाटकला पाणी वळवण्यासाठी पर्यावरण आणि वन्यजीव अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास कर्नाटकला या अनुज्ञप्ती मिळणे कठीण होणार आहे.

गोवा : अब्दुल करोल आणि सहकारी यांच्या शुक्रवारी होणार्‍या धार्मिक कार्यक्रमावर बंदी घाला !

या ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी आणि इतर दिवशी ध्वनीक्षेपकाद्वारे सहकार्‍यांना संबोधित करतात. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत चालू असतो. यामुळे गावातील शांतता भंग होत आहे.

गोवा : वर्ष १९७० मध्येच ‘वास्को’ शहराचे नामांतर ‘संभाजी’ झाले होते !

२० नोव्हेंबर १९७० या दिवशीच्या राजपत्रात आहे नोंद ! स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे हे अपुरे राष्ट्रीय कार्य पूर्ण करून त्यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या वर्षात त्यांना अनुरूप श्रद्धांजली द्यावी, अशी समस्त गोमंतकियांची अपेक्षा भाजप सरकारने पूर्ण करावी.

‘पणजी स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची कामे राज्य प्रशासनाच्या संमतीअभावी रखडली

पणजी स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अंतर्गत १ सहस्र ५३ कोटी ८० लाख रुपये किमतीची ४९ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली होती, तर यामधील केवळ निम्मे प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. २३ प्रकल्पांची ६७० कोटी रुपये किमतीची कामे रखडली आहेत.

गोवा : विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची बाल हक्क आयोगाची मागणी

बाल हक्क आयोग किंवा मानवाधिकार आयोग यांना गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांचा कळवळा न येता गुन्हे करणार्‍यांचा कळवळा कसा काय येतो ?

गोवा : गांजे येथील श्री शांतादुर्गा आणि श्री गांजेश्वरी या मंदिरांमध्ये चोरी !

गोव्यातील मंदिरे अजून असुरक्षितच ! अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरला !

कर्नाटकातील शेतकर्‍यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर म्हादईवरील प्रकल्पावरून निदर्शने !

‘‘म्हादईवर उभारण्यात येणार्‍या कळसा-भंडुरा प्रकल्पांवरून भाजप राजकारण करत नाही. भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सिद्धतेत आहे. कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाने लवकरात लवकर प्रकल्पाला संमती देऊन ती केंद्राला पाठवली पाहिजे.’’ – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

भगवान परशुराम हेच गोव्‍याचे निर्माते, तर छत्रपती शिवाजी महाराज आराध्‍यदैवत ! – सत्‍यविजय नाईक, दक्षिण गोवा समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘शांत गोव्‍याला संवेदनशील प्रदेश बनवण्‍याचे षड्‍यंत्र ?’